काय लिहायचं यावर जेव्हा मी येतो तेव्हा बरेच विचार डोक्यातून या कानापासून त्या कानापर्यंत अगदी बाहेर येतात ,पण नेमकं कुठं काय लिहायचं हे कोड पडत, विचारांना कुठला आलाय गणितातला काटेकोरपणा ,ते बेधुंद असतात वावटळातल्या त्या पानासारखे, जे कुठून तरी कोणत्या तरी झाडावरून आयुष्याचा शेवट करून गळून पडलेले असतात ,न काही जण तर कुणीतरी तोडून टाकलेल्या पानासारखे ,त्यात कुणी देवाला अर्पण केलेली सुद्धा असतात, तसेच हे विचार गुंता झालेले चांगले, वाईट, पण पान सगळी सारखीच, विचारांना काय आणि कसले ते नियम , शेकडो माणस शेकडो विचार ,प्रत्येकाचे विचार वेगळे, आपला विचार समोरच्याला पटावा हा प्रत्येकाचा विचार तेवढा जुळणारा ।।। अर्धे आयुष्य यातच निघून जात,मी मात्र मन मोकळे करिण्यासाठी लिहतो ,माझे विचार कुणाला पटावेत हा खटाटोप कशाला हवा माणसाला ,खरतर वहीत लिहण उत्तम,पण online चा जमाना म्हणतात ना ,वही कशाला सांभाळायची ,ओझं बिनकामच,पावसात भिजेल कि काय ,कुणी पळवेल कि काय, यापेक्षा हे माध्यम सोयीस्कर, माझ्या मित्राने मला दिलेला हा सल्ला
Friday, August 5, 2016
नवीन सुरवात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment