Sunday, August 14, 2016

अनोळख्या आजीचा आशीर्वाद

लिहावं कि नाही याबद्दल दुमत होत तस,पण लिहावं वाटत,नुकताच ऑफिस चा ब्रेक झाला,मी थोडा वेळ थांबलो होतो,बाकीचे सगळे निघून गेले होते,मी ऑफिसच्या मजल्यावरून खाली आलो, काही खायचं असं वाटतं नव्हतंच,त्यामुळे थोडा रेंगाळत राहिलो,कुणाला तरी call कारावास वाटलं ,वातावरण छान झालं होतं,ढगाळस काहीतरी, कित्येक दिवसांनी गजबजलेला रस्ता रिकामा वाटत होता, मी तिथेच थोडासा थांबलो,एकांत म्हणून, आज सकाळीच TV वर advertisement पहिली, 15 aug होता उद्या, गरिबांना मदत करताना खूप जण दाखवत होते त्या advertisement मध्ये,विचार आला असं हे 15ऑगस्ट लाच का दाखवतात, पण मला लिहावस वाटलं कारण आज माज्यासोबत असच काहीस घडलं
रेंगाळत असताना एक व्यक्ती माज्याजवळ आली साधारण 28-30 असेल वय,माज्याकडे मदत मागितली, नागपूरचे होते असे म्हणाला तो व्यक्ती,त्यासोबत 6 म्हणजे एकूण 7 जण होते,3 भाऊभाऊ असावेत आणि त्याची बायका, आणि एक वयाची 60 गाठलेली एक म्हातारी,मी खिशात हात टाकला ,पाकिटातून 100 रु ची नोट काढली आणि दिली, जे 100 रु स्वतःच्या कमाईतून होते, ना गर्व वाटला ना अभिमान,पण एक शंका आली हे असे इतक्या दूर कसे आले वगैरे वगैरे, तो म्हणत होता,कामानिमित्त आलेलो काम नाही मिळालं न पैसे संपले आहेत,मला काही विचारावासा सुद्धा वाटलं नाही,त्याची डोळेच काय ते सांगून गेले मला,लाचारी म्हणा किंवा आलेली परिस्थिती ची त्याना लाज वाटत होती ती वाढली असती, त्यातला त्याचा मोठा भाऊ जरा दाढी वाढलेली,म्हणाला साहेबकडून 200 रु तरी घे रे, माज्यासारखा माणूस,आज साहेब झाला,मला वाईट वाटलं म्हणजे वयानं मोठी माणसं मला साहेब म्हणतात,ते हि 100-200 रु साठी, हि कसली बाजू माणसांची, याला काय म्हणावं ,पण असो मला भरून आलं शेवटी ,जाता जाता ती म्हातारी आशीर्वाद असुदे रे म्हणाली, हात वर केला दुरूनच अशिर्वादला,थोडस हास्य उमटले चेहऱ्यावर,पण मला समाधान मात्र वाटलं पैशाचं दिल्याचं नाही, कुठं तरी माझ्यात पण माणुसकी जिवंत आहे म्हणायची,
कुणीतरी म्हटलं आहेच

कुणा गरजू ला मदत करताना त्याच्या डोळ्यात बघू नका,तुम्हाला गर्व होईल,मी मात्र नजरेला नजर न भिडवता परत आलो,याचंच समाधान म्हणा

Saturday, August 6, 2016

Play store

सुना है प्ले स्टोर पर सबकुछ मिलता है...
चलो कुछ बिखरे रिश्ते सर्च करते है..

Friday, August 5, 2016

भावासारखा मित्र


सुरवातीचा महिना असाच गेला मी राहायचो तो आदया नावाचा मित्र,माझा senior , मला भावासारखं मानणारा माझा मोठा मित्र,माझा dance patner,असा तो, त्याच्याकडे एक महिना काढला मी ,देहू ला राहायचो तो,मी पण तिथंच पण देहू आणि job याचा काडीमात्र सम्बध नाही ,हा पण तिथं मी पालखी पहिली आयुष्यात पहिल्यांदा , रोज उठायचं ,एखादं बुक एखादी movie , आणि रात्रीच जेवण करून झोपायचं हेच माझं तेव्हाच routine, आदया कड इलेक्ट्रिक शेगडी होती दुर्देवाने ती माज्याकडूनच खराब झाली,कशी वापरायांची याच अर्धवट माहिती,पण तो जास्त चिडला नाही समजून घेतलं त्यानं, न कस असत अशी माणस भेटायला नशीब लागत, न मग भाऊ म्हटल्यावर काही गोष्टी हक्क थोडा जास्त लागतो,असाच त्याचा शर्ट एक दिवस पार्टीमध्ये घातला,न परत तो माझ्याकडंच राहिला, त्याच त्याला राग आला,तो कॉल वर बरेच बोलला ,पण माझं हेतू तसा काही नव्हता ,मी त्याला 2 शर्ट परत केले त्याचा एक न नवीन एक, नंतर थोडं बिनसलं आमचं, पण इथं चूक कुणाचीच नव्हती , मी भाऊंच्या हक्काने घेतला त्यात  असं वाईट काही नव्हतं, न तो बोलला कारण त्यासाठी तो special होता,कुणी खास व्यक्तीने दिलेला,मग तो रागात बोलला, इथं घटना असं घडतात फक्त नियतीचा खेळ असही म्हणतील काहीजण ,,।।
असच असत, माणुस कितीही जवळचा असला तरी एखाद्या बिचकट प्रसंगी तो कसा वागेल याचा काही नियम नसतो,











रात्रपाळी

कॉलेज संपलं की उराशी श्रीमंतीची स्वपने घेऊन अनेक तरुणतरुणी पुण्याची वाट धरतात, पुण्यात job शोधणं तस खूप अवघड समुद्रात रेखीव शिंपला शोधावा तस हे काम,कष्ट तरी घ्यावे लागतातच पण प्रत्येकाला कष्टाचे फळ मिळणे म्हणजे चुकूनच,
पण वेळ लागतो मरणाचा, काहीजण हातपाय गाळून घरी जातात , काही वाईट संगतीने पैसे मिळवत आयुष्याची वाट बिघडवतात ,कुणी छोटासा कसलातरी जॉब करत पैशाची टंचाई भागवत मनात चांगल्या job ची आशा ठेवून नवीन job साठी प्रयत्न करत असतात ,त्यातला मी एकेकाळी असं प्रयत्न करणार तरुण ,
काही दिवस मित्राकडे काढले,एक मिळाला जॉब tech support, घंटा माहित नसलेलं पैशासाठी काढले 6 महिने, खाणंपिणं यात सपंल ते,वेळ वाया नुसता,त्यात nightship, आमचे विचार रात्री job न सकाळी जरा झोपून परत अभ्यास न परत शोधाशोध,इतकं सोपं नसत हे नंतर कळलं, बोलायला काय ओ ,स्वप्ननांची दुनिया,
सर्वजण यावर बोलले, 6 महिन्यातल्या 190 दिवसातले 50 दिवस सूर्य बघितला असेल मी,ते पण घरी गेलेले न सुट्टी चे दिवस पकडून,रात्रीची भीती आता मोडली त्यामुळे, रात्रीच काम करणं खरच सोपं नसत ते पण नेहमी रोज , आयुष्यच भरीत होत असत 5 दिवस काम 2 दिवस अंथरूण, पण मित्र मिळतात खूप सगळेच सारखेच , core field मध्ये काम करायची इच्छा बाळगणारे पण असं कधीच होत नाही,त्यपेक्षा 3 महिने study कर न मग प्रयत्न करणे उत्तम,अश्या वेळी धीर धरता यायला हवा,मार्गदर्शन हवं,

खरतर मला रात्र आवडते ,शांत,धीरगंभीर कुठे दगदग नाही, आवाज नाही,पण हे झालं  स्वतःसाठी , माणसाने रात्र सुद्धा जगावी पण स्वशांतीने, स्वतः साठी
दुसऱ्याची चाकरी करायला नव्हे,

उधार मन

"खरतर आयुष्यात प्रत्येक क्षणी प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागेवर बरोबर असच वागत असते."
एखाद्या क्षणी ती व्यक्ती अशी का वागली आपल्यला तस का बोलली, का रागावली हे जाणण्यासाठी
त्या व्यक्तीच्या जागेवर स्वताला ठेवून बघायचे म्हणजे कस माहितेय त्याच  व्यक्तीचे मन उधार घ्यायचे.नाहीतर आपण म्हणजे तो व्यक्ती असं समजून आपण असं वागलो असत तर, सारासार विचार करून झाला की कळत की
मुळात चूक आणि बरोबर अश्या दोन दोन गोष्टी अस्तित्वातच नसतात.
एखादी गोष्ट एखाद्या साठी बरोबर असते तर तीच गोष्ट दुसय्रा साठी चुकीची असते.प्रत्येक जण आपल्या सोयीनं अर्थ घेत असतो
ज्यांना ती गोष्ट चुकीची वाटते अश्या माणसांची संख्या जास्त झाली कि,
आपणच ती गोष्ट "वाईट" म्हणून ठरवून टाकतो." पण कुणी मुद्दाम चुकत नसतो कुणी मुद्दाम बोलत नसतो,परिस्थती ची जागा चुकली की शब्दांचे अर्थ बदलू लागतात, मग कुणी स्वार्थी तर कुणी नालायक ठरतो, पण प्रत्येकाला आपण निस्वार्थी आहोत असच वाटत, हे शब्द म्हणजे नुसते अर्थ असलेले पण यांना स्वतःची ओळख नाही जिकडच पारडं जड तिकडचे ते,मनावरचं पारडं जिकडे झुकेल तिकडं गोड

नवीन सुरवात

काय लिहायचं यावर जेव्हा मी येतो तेव्हा बरेच विचार डोक्यातून या कानापासून त्या कानापर्यंत अगदी बाहेर येतात ,पण नेमकं कुठं काय लिहायचं हे कोड पडत, विचारांना कुठला आलाय गणितातला काटेकोरपणा ,ते बेधुंद असतात वावटळातल्या त्या पानासारखे, जे कुठून तरी कोणत्या तरी झाडावरून आयुष्याचा शेवट करून गळून पडलेले असतात ,न काही जण तर कुणीतरी तोडून टाकलेल्या पानासारखे ,त्यात कुणी देवाला अर्पण केलेली सुद्धा असतात, तसेच हे विचार गुंता झालेले चांगले, वाईट, पण पान सगळी सारखीच, विचारांना काय आणि कसले ते नियम , शेकडो माणस शेकडो विचार ,प्रत्येकाचे विचार वेगळे, आपला विचार समोरच्याला पटावा हा प्रत्येकाचा  विचार तेवढा जुळणारा ।।। अर्धे आयुष्य यातच निघून जात,मी मात्र मन मोकळे करिण्यासाठी लिहतो ,माझे विचार कुणाला पटावेत हा खटाटोप कशाला हवा माणसाला ,खरतर वहीत लिहण उत्तम,पण online चा जमाना म्हणतात ना ,वही कशाला सांभाळायची ,ओझं बिनकामच,पावसात भिजेल कि काय ,कुणी पळवेल कि काय, यापेक्षा हे माध्यम सोयीस्कर, माझ्या मित्राने मला दिलेला हा सल्ला